वार्ताहर: नेवासा
नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर या शाळेने आषाढी एकादशी निमित्त गावांमधून विद्यार्थ्यांची दिंडी काढली. नागापूरचे लोकनियुक्त सरपंच अँड संदीप कापसे अँड दीपक चक्रनारायण अँड संभाजी काळे मा चेअरमन सिताराम काळे भाऊसाहेब कापसे श्रीधर काळे धोंडीराम लवांडे बन्सी कापसे नानासाहेब कापसे तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश काळे शा व्य समिती माजी अध्यक्ष संतोष काळे कैलास काळे यांनी जागृत देवस्थान नागनाथ नागनाथ मंदिर सभा मंडप परिसरात दिंडीचे स्वागत केले.
यावेळी अग्रभागी सुंदर अशी पालखी विठोबा रखुमाईच्या वेशातील विद्यार्थी होते भगवी पताका वारकऱ्यांचा वेष टाळांचा गजर यामुळे नागापूर परिसर भक्तीमय झाला होता. अँड दीपक चक्रनारायण व सौ चक्र नारायण यांनी फुगडी खेळून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली भुसारी यांनी दिंडी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव निर्माण होतो व कलागुणांना वाव मिळतो असे सांगितले व येथून पुढे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
सरपंच अँड संदीप कापसे यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले व अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो यापूर्वी शाळेला नेहमी सहकार्य केले व येथून पुढे सुद्धा शाळेला सहकार्य केले जाईल असे सांगितले.
जागृत देवस्थान नागनाथ मंदिर सभा मंडपात विद्यार्थ्यांना अँड संदीप कापसे यांचेकडून खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनील काळे तुषार काळे सादववराव अडागळे स्मिता लवांडे अंगणवाडी ताई पुष्पा कापसे सौ जनाबाई कापसे गावातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका श्रीमती योगिता गिरी यांनी केले.










