प्रतिनिधी राजेंद्र उंडे राहुरी,
टाळ वाजे,मृदंग वाजे,वाजे हरीचा विणा,माऊली निघाली पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा चिमुकल्यांच्या स्वरामुळे देवळाली प्रवरात अवतरली पंढरी
आषाढी वारी निमित्त सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अगदी काना कोपऱ्यातून विठ्ठल नामाचा जयघोष वारीतून केला जात आहे. जिल्हा परीषद मराठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी एक विचार करून आपण आपल्या गावात मध्येच आषाढी दिंडी वारी काढण्याचे ठरवले व सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.विठ्ठल नामाचा जयघोष करीत,ज्ञानबा तुकाराम चा जयघोष करीत देवळाली प्रवरात भक्तिमय वातावरणा निर्माण होवून रिंगण सोहळ्यामुळे अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटली.

अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विठ्ठल रुक्माई वेशभूषा साकारली.विठ्ठलाच्या भुमिकेत साईप्रसाद राजेंद्र उंडे तर रुखमिणीच्या भुमिकेत श्रद्धा राजेंद्र उंडे यांनी साकारली. शाळेच्या मैदानावर पहिला रिंगण सोहळा पार पडला.दिंडीत टाळ वाजे,मृदंग वाजे,वाजे हरीचा विणा,माऊली निघाली पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. त्याच बरोबर ज्ञानबा तुकाराम चा जयघोष करत पावली खेळून बाल वारकऱ्यांनी उपस्थित पालकांची मने जिंकली.देवळाली प्रवरा शहर भक्तिमय वातावरणामध्ये अक्षरशः चिंब झाले.दिंडीत रिंगण सोहळा साजरा केला जातो.
त्याच प्रमाणे बाल वारकऱ्यांनी रिंगण सोहळा साजरा करुन अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडली.जिल्हा परीषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळा साजरा केला.हा रिंगण सोहळा पाहुण असे वाटत होते की खरोखर पंढरीची वाट धरली तर नाही ना. रिंगण सोहळ्यात मध्यभागी विठ्ठल रुखमीणीच्या वेशभूषा साकरलेले विद्यार्थी,तर पखवादावर थाप मारणारा चिमुकला विद्यार्थी टाळ मृदुंगाच्या निदनात शिक्षक व विद्यार्थी यांच्या रंगलेली पावली सोहळ्याचे आकर्षन ठरले.हा रिंगण सोहळ्यात आखो देखो सोहळा पाहत असताना जनू काही पंढरीचा विठ्ठल सावळा खरोखर देवळाली प्रवरात अवतरला की काय असा भास होत होता.चिमुकल्यांचा रिंगण सोहळा देवळालीकरांसाठी खास आकर्षक ठरला आहे.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी माऊली माऊली असा जयघोष करुन दिंडीची सांगता केली. ही दिंडी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका मंगल पठारे, किशोर नवले,स्वाती पालवे, सुप्रिया आंबेकर, ऐ.व्ही.तुपे, सुनिता मुरकुटे, व्ही.डी.तनपुरे, भारती पेरणे,जकीया इनामदार,मिनाश्री तुपे,भास्कर बुलाखे, हसन शेख, एस.बी.जाधव यांनी परीश्रम घेतले.










