MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

बिबट्याच्या हल्ल्याचा जखमी होवून हि दोन भावांचा जीव वाचविण्यासाठी श्रद्धाने केला संघर्ष.

by प्रशांत शेळके पा.
June 28, 2023
in बातमी कामाची
बिबट्याच्या हल्ल्याचा जखमी होवून हि दोन भावांचा जीव वाचविण्यासाठी श्रद्धाने केला संघर्ष.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

बहीण बनली भावांची पाठीराखीन, सात्रळ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची शौर्यगाथा.

प्रतिनिधी राजेंद्र उंडे राहुरी,
मामाच्या घरून वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने कानडगावला रात्री मोटरसायकलने घरी येत होते. घराच्या अगदी जवळ आले असताना. गिन्नी गवतातून. बिबट्याने मोटारसायकलवर अचानक झडप घालून हल्ला केला. या हल्ल्यात ते तिघेही मोटरसायकल वरून खाली पडले
मोटरसायकल मोठा भाऊ तेजस चालवीत असल्याने तो थोड्या अंतरावर जाऊन पडला.

READ ALSO

युथ रि.प.चे नेते मनोज भाई संसारे यांना कडा येथे भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

या काळ्याकुट्ट अंधारात कु. श्रद्धा हिच्यावर बिबट्याने पंजाचा मारा केल्यामुळे ती जखमी झाली होती. आणि खाली पडलेली होती पण तिचा मोठा भाऊ कुणाल हा बिबटच्या अगदी समोर पडलेला होता. बिबट्या कुणालवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. काळ्याकुट्ट अंधारात हातात कोणतेही हत्यार नसताना प्रसंगवधान राखून फोटोग्राफर कुणाल याने बिबट्याच्या अंगावर, डोळ्यावर हातात आलेल्या मातीचा मारा केला.

बिबटच्या समोर पडलेला भाऊ मातीच्या साहाय्याने प्रतिकार करीत असल्याचे तिने पाहिले तिही जखमी असताना पळत जाऊन त्याच्यावर मातीचा व ढेकळाचा मारा केला. बिबट्याने श्रद्धाकडे लक्ष केंद्रीत केल्याने अंधारात पडलेला दुसरा मोठा भाऊ तेजस हा पळत श्रद्धा जवळ आला. त्याने हि बिबट्यावर ढेकूळ, दगड यांचा मारा केला. खूप वेळ हा संघर्ष चालू होता, खूप मोठा आरडा आरोड झाल्यामुळे आजूबाजूचे वस्तीवरचे लोक पळत आले.

टाँर्चच्या उजेडामुळे बिबट्या तेथून पळ काढला…वेळेचे भान राखून आपल्या भावाचे रक्षण करणारी श्रद्धा ही खरच आपल्या भावाची पाठीराखीन ठरली. हि घटना राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे घडली आहे.राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कु. श्रद्धा भाऊसाहेब गागरे ही एफ. वाय. बी. ए. वर्गात शिकत आहे. रविवारी रात्री ९.३० ते १०:३० च्या सुमारास बिबट्याने अचानक केलेल्या हल्यात कु. श्रद्धा भाऊसाहेब गागरे पाटील या १९ वर्षाच्या बहिणीने आपल्या मोठ्या भावाला बिबट्याच्या हल्यातून वाचवले.ती स्वतः बिबट्याच्या हल्यात जखमी झालेली होती. तिच्या डाव्या मांडीला बिबट्याच्या दोन नख्या लागलेल्या आहेत. बिबट्याच्या तावडीतून आपल्या भावाला वाचविण्यासाठी स्वतः जखमांच्या वेदना सहन करत भावाची पाठीराखान ठरली.दुसऱ्या दिवशी जखमी अवस्थेत विद्यापीठ परीक्षा दिली.

घडलेली घटना अशी- रविवार रोजी कु. श्रद्धा व तिचे मोठे दोन भाऊ फोटोग्राफर कुणाल भाऊसाहेब गागरे व तेजस भाऊसाहेब गागरे हे लोणीहून दत्तात्रय नामदेव विखे या मामाच्या घरून वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने कानडगावला रात्री मोटरसायकलने येत होते. घराच्या अगदी जवळ आले असताना… रस्त्याच्या कडेला असलेल्या गिन्नी गवतातून बिबट्याने अचानक त्यांच्या मोटारसायकलवर झडप मारली.या झडपे मोटारसायकलवरील तिघे हि खाली पडले.बिबट्याने श्रद्धाच्या मांडीवर पंचा मारुन हल्ला केला. मोटरसायकल चालवित असलेला मोठा भाऊ तेजस थोड्या अंतरावर जाऊन पडला… काळ्याकुट्ट अंधारात मोठा भाऊ कुणाल हा बिबटच्या अगदी समोर पडलेला होता. श्रद्धा हिच्यावर बिबट्याने पंजाचा मारा केल्यामुळे जखमी झालेली होती..जखमी अवस्थेत खाली पडलेली होती…परंतू आपला मोठा भाऊ कुणाल हा बिबटच्या अगदी समोर पडलेला लक्षात येताच.

श्रद्धाने वाघीणीचे रुप धारण करीत काळ्याकुट्ट अंधारात हातात कोणतेही हत्यार नसताना प्रसंगवधान राखून कुणाल याला वाचविण्यासाठी बिबट्याच्या अंगावर, डोळ्यावर… हातात आलेल्या माती व ढेकळाचा मारा सुरु केला. ती एकाकी ढेकळाचा मारा करुन संघर्ष करीत असताना अंधारात पडलेला दुसरा भाऊ तेजस हा पळत आला.. त्याने हि बिबट्यावर ढेकूळ, दगडाचा मारा सुरु केला… खूप वेळ हा संघर्ष सुरु होता,ढेकळाचा व मातीच्या माऱ्याने बिबट्या किंचितही हलला नाही.संघर्ष करता करता श्रद्धा व तेजस यांनी मोठ मोठ्याने आरडा आरोड केल्यामुळे… आजूबाजूचे वस्तीवरचे लोक टाँर्च घेवून पळत आले… टाँर्चच्या उजेडामुळे बिबट्या तेथुन धुम ठोकली….वेळेचे भान व प्रसंगवधान राखत आपल्या स्वतः बरोबर भावाचे रक्षण करणारी श्रद्धा ही खरच भावाची पाठीराखीन ठरली आहे…

लहान बहिणीने व तिच्या दोघा भावांना वाचविण्यासाठी दाखवलेल्या धाडसचे कौतुक होत आहे.घटनास्थळी वन अधिकाऱ्यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली. या परीसरात पिंजरा लावण्याची मागणी केली.श्रद्धा हिचे सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, डॉ. जयश्री सिनगर, कार्यालयीन अधीक्षक श्री. विलास शिंदे, श्री. महेंद्र तांबे, महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका व सेवक वृंद व विद्यार्थी -विद्यार्थिनींनी श्रद्धाच्या धाडसी शौर्यगाथेचे कौतुक केले आहे.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarCrimeMaharashtraShraddha fought to save the lives of these two brothers after being injured by a leopard attack.
Previous Post

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Next Post

शाळेच्या चिमुकल्यांच्या दिंडीने भक्तीमय वातावरण; चिमुकल्यांच्या रिंगण सोहळ्याने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटली.

Related Posts

युथ रि.प.चे नेते मनोज भाई संसारे यांना कडा येथे भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

युथ रि.प.चे नेते मनोज भाई संसारे यांना कडा येथे भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

May 13, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News