प्राण्यांना बोलता येत नाही, पण ते प्रेम व्यक्त करू शकतात. एका व्हिडीओ मध्ये मुक्या प्राण्यासंदर्भात एक क्रौर्याचा प्रकार समोर आला आहे, जो पाहून प्रत्येकाचा राग अनावर होईल. भटक्या कुत्र्यांना मारहाण करणे, छळ करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सदरील व्हिडिओमध्ये एका कुत्र्याचा पिल्ल्याचा छळ होताना दिसत आहे. व्हिडीओ मधील तरुण कुत्र्यासोबत अतिशय क्रूरपाने वागत आहे बिंद्रपाल नावाच्या तरुणाने कुत्र्याचे दोन्ही पाय पकडून त्याला हवेत गोल-गोल फिरवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शक्तीमान मालिकेचे शीर्षक गीतही ऐकायला येत आहे.
आरोपीने हा व्हिडिओ स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपीविरुद्ध प्राणी क्रूरता कायद्यान्वये १९७१ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, भारतीय वन संवर्धन कायदा १९७१ प्राण्यांची शिकार करणे, त्यांच्यासोबत स्टंटबाजी करणे, कोणत्याही प्राण्याची निर्घृण हत्या करणे हे गुन्हे आहेत. यामध्ये आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये आर्थिक दंडाची तरतूद आहे. या व्हिडिओला अनेक युजर्सने सोशल मीडियावर शेअर केलं आहे, तर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.










