टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील विरोली परिसराला मोठा चक्रीवादळाचा तडाखा बसला . घरावरील पत्रे उडाले झाड विजेचे खांब ही कोसळले. या बाबत सविस्तर माहिती अशी की बुधवार ता. २६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोराचे वारेवाहु लागले वाऱ्या च्या जोरदार वेगाने विरोली येथील शेतकरी देवराम लिंबाजी मोरे नवनीत अशोक भागवत तुळशिराम जाधव ज्ञानदेव जाधव अंजनाबाई गाडगे यांचे घरावरील पत्रे उडुन गेले. त्यामुळे घरातील धान्य व संसार उपयोगी वस्तुचे मोठे नुकसान झाले झाडे उन्मळुन पडली अनेक विजेचे पोल तुटुन पडले
त्यामुळे गावातील विज प्रवाह बंद करण्यात आला. या नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आसुन त्याना तातडीची मदत मिळावी अशी मागणी होत आहे. या बाबतची माहिती कामगार तलाठी प्रतिभा सोनवणे यांना समजताच त्यानी तातडीने तहसिल कार्यालयाला माहिती देऊन पंचनामे करून वरिष्ठाना आहवाल पाठवु असे सांगितले.
कांदा बीयाचे मोठे नुकसान …
बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्या मुळे कांदा बी तयार करण्यासाठी लागवड केलेले गोंडे मोडुन पडले व शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले या आवकाळी चा मोठा फटका बसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे










