टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पारनेर कान्हूर पठार रोड वरील गणपती चौफुला विरोली येथील गणपती मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला . पहाटे ५ वाजता मंगल स्नान पुजा आरती झाल्या नंतर सकाळी ७.३० वाजता होम हवन पुर्णाहुती पुजा विधी सन्मानिय बालयोगी हभप जर्नाधण महाराज मुंढे व समाज सेवक सुनिल शंकर फापाळे यांच्या यांच्या हस्ते कलश पुजा विधी पार पडल्या नंतर सकाळी ९.३० वाजता कलश पुजा पार पडल्या नंतर . कलशाची मंदिर प्रदक्षिणा पार पडल्या नंतर मंदिर शिखरावर कलशारोहण करण्यात आले.
सदर मंदिर हे अत्यंत पुरातन कालिन आसुन या मंदिराच्या कळसाचे आणि संपूर्ण जिर्णोदाराचे काम ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनिल शंकर फापाळे यांनी स्वखर्चाने केला त्या बद्ल श्री . गणेश सेवा मंडळाचे वतीने त्यांचे जोरदार स्वागत करून सन्मान करण्यात आले व आभार मानले. या कार्यक्रमाचे पौराहित्य कौस्तुभ जोशी . व पुष्कर कुलकर्णि यांनी केले










