MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

वाळुंज पब्लिक स्कूलमध्ये सुमधूर गीतांचा रंगला सांस्कृतिक कार्यक्रम; विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम स्कूलमध्ये होत आहे – राहुल झावरे

by प्रशांत शेळके पा.
January 24, 2023
in नगर विभाग
वाळुंज पब्लिक स्कूलमध्ये सुमधूर गीतांचा रंगला सांस्कृतिक कार्यक्रम; विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम स्कूलमध्ये होत आहे – राहुल झावरे
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळुंज (ता. नगर) पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन सर्वांना ओलाचिंब करणार्‍या पाऊस गाणीतून उत्साहात पार पडला. पाऊसाच्या विविध गाण्यांतून विद्यार्थ्यांनी निसर्गाचे नयनरम्य रुप, डोंगर माथ्यावरुन फेसाळणारे शुभ्रधवल धबधबे असा विलोभनीय पावसाळाच डोळ्यासमोर उभा केला.

गणेश वंदनेने कार्यक्रमाची सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटात आणि चिंब पावसाच्या सरीत सुमधूर गीतांमधून धुंद करणारा अनुभव उपस्थित पालक व प्रेक्षकांनी अनुभवला. विविध पाऊस गाणीवर एन्जॉय करताना चिमुकल्यांनी बहारदार आपल्या नृत्याचा कलाविष्कार घडविला. उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. पावसाचे गार-गार थेंब अंगावर झेलताना रोमँटिक गाण्यांची साथ सर्वांना भारावून गेली.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष म्हस्के, प्रा. भाऊसाहेब रोहोकले, शिराढोणचे सरपंच दादा दरेकर, ह.भ.प. शेळके महाराज, माजी मुख्याध्यापिका कमल टेमकर, डॉ. पूनम कानवडे, प्राचार्या सोनल गायकवाड, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, सबाजीराव गायकवाड, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रुथ नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

READ ALSO

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

प्रारंभी ढोलच्या निनादात लेझीम पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात प्राचार्या सोनल गायकवाड यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करुन, वाढत्या गुणवत्तेचा आलेख मांडला. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणार्‍या उपक्रमाची माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात नैपुण्य मिळविणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. 2022-23 या शैक्षणिक वर्षाचा उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार मनीषा नागपुरे व उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार पंकज वाळके यांना देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

राहुल झावरे म्हणाले की, मुलांमध्ये दडलेले विविध कला, गुण ओळखण्याचे काम पालकांनी करावे. त्यांच्यातील क्षमता ओळखून त्या दिशेने प्रोत्साहन दिल्यास मुलांचे उज्वल भवितव्य घडणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम वाळुंज पब्लिक स्कूल करत आहे. सामाजिक बांधिलकी व तळमळीने गायकवाड परिवार योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रा. भाऊसाहेब रोहोकले म्हणाले की, ग्रामीण भागातील गरीब शेतकर्‍यांच्या मुलांना इंग्रजीचे अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी सबाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठानने वाळुंज पब्लिक स्कूलची मुहुर्तमेढ रोवली. या शाळेच्या माध्यमातून उत्तम प्रकारे विद्यार्थी घडविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दादा दरेकर म्हणाले की, मागील वीस वर्षापासून वाळुंज पब्लिक स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहे. गायकवाड परिवाराचे कृषी व शिक्षण क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार म्हणाले की, ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालवणे कठीण काम आहे. मात्र गुणवत्तेने हा शिक्षणाचा वटवृक्ष बहरला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव लिंबोरे व गणेश खुडे यांनी केले. आभार गणेश दरेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarMaharashtraRangala cultural program of melodious songs at Walunj Public School; The work of building self-confidence among students is going on in the school - Rahul Zaware
Previous Post

चांदबिबी महालावरुन अभियानाची सुरुवात; समाज शोषक व न्याय कर्कासूरांना संपविण्यासाठी रक्तहीन डिच्चू कावा क्रांतीची हाकचांदबिबी महालावरुन अभियानाची सुरुवात.

Next Post

महाराष्ट्र राज्य होमिओपॅथीक डॉक्टर्स कृति समितीच्या वतीने सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा.

Related Posts

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

June 30, 2023
नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

June 30, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News