इन्शुरन्स चे पैसे मिळणार असे समजल्यावर सात आरोपी मिळून शालीनी जाधव यांच्या घरात जबरदस्तीने घूसले आणि शालिनी जाधव यांच्यासह त्यांच्या घरातील लोकांवर कोयत्याने वार करून लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. ही घटना राहरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे दिनांक ८ डिसेंबर रोजी घडली.
शालीनी बाजीराव जाधव, वय ४० वर्षे, राहणार बारगांव नांदुर, ता. राहुरी. यांनी
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, शालीनी जाधव यांची नणंद लहानुबाई दिलीप पवार यांच्या पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर त्यांच्या सासरच्या लोकांनी लहानुबाई यांना घरातुनु हकलून दिले होते. म्हणुन त्या शालीनी जाधव यांच्याकडेच राहतात. त्यांच्या पतीच्या निधनानंतर इन्सुरसचे पैसे त्यांच्या नावावर वारसा हक्काने येणार असल्याचे लहानुबाई हिचे सासरच्या लोकांना समजले होते. दिनांक ८ डिसेंबर रोजी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शालीनी केली.
जाधव ह्या घरात घरकाम करत असताना आरोपी हे कोयता, काठी घेऊन शालीनी जाधव यांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसले. आणि म्हणाले की, तुझी नणंद कुठे आहे. तिला आज सोडणार नाही. तुम्हाला पैसे पाहीजे का. तुम्हाला आज संपवून टाकतो. असे म्हणून मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागले. त्यावेळी शालीनी जाधव तसेच त्यांच्या घरातील इतर लोकांवर कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच लाया बुक्यांनी व काठीने मारहाण केली.









