हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी ठेकेदाराचा मजूर तुषार अण्णासाहेब दरेकर (वय ३२ वर्षे) याचा कामावर असताना शुक्रवार दि. ९ रोजी मृत्यू झाला. मृतदेह घराच्या परिसरात संशयास्पदरीत्या टाकल्याने मयत तरुणाच्या नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने या तरुणाच्या सोबत कामावर असलेल्या चार जणांना श्रीगोंदा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील वीज वितरण कंपनीचे अनेक खाजगी ठेकेदार असून ते वीज जोडणी, विद्युत खांब उभारणीचे कामे करतात. अशाच एका ठेकेदाराकडे तुषार दरेकर व इतर कामगार काम करत
संशयास्पद आढळला मृतदेह
» तुषार दरेकर हा नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. परंतू त्याचा मृतदेह अंगावर जखमांसहीत वस्तीजवळ सापडल्याने नातेवाईकांनी खुनाचा संशय व्यक्त केला. त्याचे शव विच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिसांवर अविश्वास दाखवल्यामुळे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी त्याचे पुणे येथील ससून रुग्णालयात शव विच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
होते. शुक्रवार दि. ९ रोजी रात्री होते. शुक्रवार दि. ९ रोजी रात्री ९:३० च्या आसपास तुषार याचा मृतदेह दरेकर वस्ती येथील त्याच्या घराशेजारी बेवारस अवस्थेत आढळून आला. तुषार कामावर गेला होता परंतू अशा पद्धतीने मृतदेह संशयास्पद मिळाल्याने व रात्री तुषार याच्या अंगावर जखमांचे निशाण आढळल्याने नातेवाईकांचा संशय वाढला. तुषार याच्या मृत्यूची श्रीगोंदा पोलिसांना नातेवाईकांनी खबर दिली. पोलिसांनी तुषार याचा मृतदेह श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात
शव विच्छेदन करण्यासाठी आणला परंतू घातपाताचा नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यामुळे त्याचा पुणे येथील ससून मृतदेह पुणे रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेला. शव विच्छेदनानंतर शनीवारी रात्री तुषार याचे शव अंत्यसंस्कार करण्यासाठी हिरडगाव येथे आणले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गुलाब मोरे व किरण जाधव करत आहेत.










