राजमाता जिजाऊ घोटाळा पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरद लक्ष्मण निमसे यांना आर्थिक प्रकरणी राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. शासकीय लेखा परीक्षणात ७ कोटी ३७ लक्ष ६२ हजार रूपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट होताच ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरद लक्ष्मण निमसे याला पोलिसांनी आज राहाता येथील त्यांच्या राहत्या घरातून गजाआड केले. त्यास न्यायालयाने १४ डिसेंबरपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे…
राहुरी येथील जिजाऊ नागरी पतसंस्थेमध्ये मोठा अपहार झाल्याने ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. अनेकदा तक्रार केल्यानंतर जिल्हा निबंधकांच्या आदेशानुसार लेखा परीक्षक संजय धनवडे व सहाय्यक अनिल निकम, रियाज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण करण्यात आले.
१ एप्रिल २०१६ ते सन ३१ मार्च २०२१ या झालेल्या सर्व व्यवहारांच्या चौकशीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आल्याचे उघडकीस आले. राजमाता पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब येवले, उपाध्यक्ष शरद निमसे, मॅनेजर कारभारी फाटक, सुनील भोंगळ, उत्तम तारडे, सुरेखा सांगळे, सुरेश पवार, दत्तात्रय बोंबले, दीपक बंगाळ या ९ जणांनी पतसंस्थेमध्ये ७ कोटी ३७ लक्ष ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याचा लेखा परीक्षणात ठपका ठेवण्यात आला आहे.
राहुरी पोलिसात लेखापरीक्षक संजय धनवडे यांनी दिवाळीपुर्वी फिर्याद दिली होती. त्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर राहुरी पोलीसांनी या ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे










