अहमदनगर – नेपाळ येथे झालेल्या इंडो-नेपाळ चँपियनशिप ५००० मीटर रनिंग सिनिअर गटामध्ये नगर तालुक्यातील अकोळनेर येथील सौरभ जाधव याने सुवर्णपदक पटकावले. ही स्पर्धा नेपाळ येथे पोखरा याठिकाणी नुकतीच पार पडली.
पोखरा इंटरनॅशनल स्टेडियम नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. यात भारत व नेपाळ या दोन देशांचे खेळाडू सहभागी झाले होते.
भारताचे प्रतिनिधी करत असलेल्या सौरभ जाधव यास सत्येंद्र यादव यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. त्यास प्रशिक्षक महेंद्र बाजारे व दीपक मालानी, राष्ट्रीय सदस्य भुवनेश यादव तसेच नातेवाईक, मित्र परिवार यांचे मोलाचे योगदान लाभले.
या यशाबद्दल सरपंच प्रतिक शेळके, माजी सरपंच अरुण जाधव, पोपट धामने, राजु शेळके, बाळासाहेब काफे, साहेबराव जाधव, अविनाश जाधव, राहुल शिंदे आदींनी सौरभचे अभिनंदन केले.










