वृत्त छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल यांचं हृदयविकाराच्या झटक्यांना निधन झालं होतं हे दुःखद घटना विसरत नाही तोच एक दुःखद बातमी पुन्हा एकदा पुढे आली आहे, पत्रकारिता क्षेत्रातील नावजलेल ज्येष्ठ पत्रकार दैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांचे रात्री 8.30 वाजता नगरमधील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले.
कुलकर्णी मूळचे कोपरगाव तालुक्यातील शिंगवे गावचे रहिवासी होते. शिस्तप्रिय कुटुंबातून असल्यामुळे मोठी शिस्त त्यांच्या अंगी होती, तरी आपल्या मित्र मंडळी मध्ये ते दिलखुलास वावरत असे, दिलखुलास व हसतमुख स्वभावामुळे ते सर्वांचे स्नेही राहिले, दैनिक लोकसत्ताचे नगर आवृत्तीचे संपादक म्हणूनही त्यांनी 20 वर्ष काम केले. नगर मधील क्रीडा, सामाजिक, नाट्य, शिक्षण चळवळींशी त्यांचा निकट संबंध होता. स्वबळावर त्यानी चालविलेले समाचार हे सायंदैनीक नगर जिल्ह्यातील सामान्यांचा निष्पक्ष आवाज होता.स्नेहालय संस्थेचे ते आजीव सदस्य होते.
महेंद्र कुलकर्णी यांचे आज रात्री 8.30 वाजता नगरमधील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले.ते 59 वर्षांचे होते.
त्यांच्यामागे पत्नी, मुलगी, विवाहित भाऊ असा परिवार आहे.
पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीचे हृदयविकारांने मृत्यू होणं हे चालू घडामोडी मध्ये दुसऱ्यांदा घडल आहे, त्यामुळे क्षेत्रातील कामाच्या ताण – तणाव बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले.










