अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणचे पदार्थ चाखून पाहण्याची विशेष आवड असते, कुठे चांगली चव कुठली चव आपल्या जिभेवरती रेंगाळते यासाठी अनेक जण भ्रमंती करत असतात. यासाठी नगरमध्ये देखील अशाच खवय्यांसाठी खास महोत्सव भरवला जातो. हा महोत्सव माशांचा असतो चार महिने वेगवेगळ्या पद्धतीचे मासे इथे उपलब्ध असतात.
अनेक जण मासे खाण्यासाठी इथे येत असतात अनेक प्रकारचे मासे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात या कामांमध्ये सर्व कुटुंब एकत्र येऊन हे काम करतात त्यामुळे त्या पदार्थाची चव अत्यंत स्वादिष्ट होते.
नगरपासून जवळ असलेल्या जेजुर जवळील ससेवाडीचे मूळ रहिवासी असणारे राजेंद्र ससे यांनी हातगाडी वर एक किलोची बिर्याणी विकून व्यवसाय सुरू केला . खाण्याचा आणि खाऊ घालण्याची आवड असल्यामुळे या व्यवसायात आपण रमलो अस ते सांगतात.
शिक्षण जेमतेम केलं आणि आपण व्यवसाय करायचं म्हणून हॉटेल चालवायला घेतले . सुरुवातीला आचारी पासून वेटर पर्यंत एकमेव तेच होते.मात्र पुढे परिस्थिती बदली व्यवसाय जोरदार सुरू झाला.

नगर मनमाड रोड पत्रकार चौकाजवळ असणारे हे दामोदर बिर्याणी हाऊस म्हणून नावलौकिक मिळालं .आपली खाद्य संस्कृती जपत नवं काही तरी करूयात म्हणून गेल्या ४-५ वर्षापासुन त्यांच्याकडे फ्रेश माश्याच्या महोत्सव भरवला जातो.
यात इथे अनेक प्रकारचे मासे ते मासे प्रेमींना ऊपलब्ध करून देतात. सुरमई , कोळंबी, बोंबील,चोपडा, बांगडा, वाम, पापलेट, बेबी सुरमई असे अनेक प्रकारचे मासे इथे असतात, भाऊच्या धक्क्यावरून या माशे आणले जातात.
नोव्हेंबर सुरू होणारा हा फिश महोत्सव ४महिने चालतो. अनेक खवय्ये इथे खास मासे खाण्यासाठी येत असतात जेवणाला स्त्रीचा हात लागला की त्याची चव उत्तम होते ,म्हणून इथे घरच्या स्त्री आनंदाने काम करतात.
चपाती,भाकरी बनवणे घरातील वहिनी,ताई बनवतात. तर या कामात सौ. ससे या देखील महत्वाची भूमिका बजावतात.घरातलं किचन जस स्त्रिया सांभाळतात तस इथे स्त्रीचं राज्य असत










